Cus-Cza

Cussed कसेड् a.--- शापित, करंटा, दूषित, आडमुठा, वाकडा, खुसपटखोर, भांडकुदळ.
Cushion कुशन् n.--- गिरदी, लोड, तक्क्या.
Cusp कस्प् n.--- टोक, अग्र, (वाटेचे) वळण.
Cuspidate कस्पिडेट् a.--- अणकुचीदार.
Custard कस्ट(र्)ड् n.--- दूध व अंड्यांच्या गोड मिश्रणाचे एक अर्धद्रव्य खाद्य. मका इ. धान्याच्या पिठापासून बनविलेले पक्वान्नात घालण्याचे स्वाद-सुगंधयुक्त चूर्ण.
Custard-apple कस्ट(र्)ड्-अॅपल् n.--- सीताफळ.
Custodian कस्टोडियन् n.--- रखवालदार, रक्षक.
Custody कस्टडि n.--- राखण, रखवाली, कैद, ताबा.
Custom कस्टम् n.--- चाल, सराव, जकात, सीमाशुल्क, दस्तुरी. पहा: ‘Convention’.
Customarily कस्टमरिलि ad.--- प्रायः.
Customary कस्टमरि a.--- संप्रदायाप्रमाणे, चालीचा.
Customer कस्टमर् n.--- गिऱ्हाईक.
Custom-house कस्टम्-हाउस् n.--- मांडवी.
Cut कट् v.t.--- कांपणे, छाटणे, कापून आकारास आणणे, बेतणे, झोंबणे. n.--- डोल, छापील चित्र, वार, जखम, फटका. अंश, प्रमाण (विशेषतः: ‘cut(s) above (something)’ - अंशतः/गुणतः वरचढ- या प्रयोगात)
Cut-off कटॉफ् n.--- विच्छेद, छेदन, छेदक.
Cut-throat कट्थ्रोट् n.--- गळेकापू, मारेकरी.
Cut up कटप् च्या भावना दुखावणे, धिक्काराणे, झिडकारणे, शी तुटकपाने वागणे.
Cutaneous क्यूटेनिअस् a.--- कातडीचा, त्वचेचा.
Cute क्यूट् a.--- टोकदार; तीक्ष्ण बुद्धीचा, चतुर, विचक्षण. गोजिरवाणा, गोंडस.
Cuticle क्यूटिकल् n.--- बाहेरील पातळ कातडी.
Cutis क्यूटिस् n.--- अंतर्साल.
Cutler कट्लर् n.--- शिकलगार, चाकू वगैरे करणारा.
Cutlery कट्लरी n.--- चाकू, कात्र्या, तलवारी वगैरे सामान.
Cutpurse कट्पर्स् n.--- खिसेकापू, भामट्या.
Cutter कटर् n.--- कापणे, कापण्याचे हत्यार. (युद्धनौकेवरील)
Cutting कटिंग् n.--- कापणे, कापलेला तुकडा.
Cuttlefish कटल्फिश् n.--- दहा शुण्डापाश असलेला एक जलजंतुविशेष.
Cyber सायबर् - (उपपद/prefix) ‘यांत्रिक-संदेशवहन-शास्त्रीय साधनांनी (संगणक इ.) लक्षित/सज्ज’ अशा आशयाचे उपपद. (उदा. Cyber City State of Singapur’)
Cybernetic(al) सायबर्नेटिक(ल्) a.---
Cybernetics सायबर्नेटिक्स् n.---
Cycle सायकल् n.--- स्वत्सरचक्र, कालचक्र.
Cyclone साय्क्लोन् n.--- वावटळ, मोठे वादळ, चाकरी वादळ.
Cyclopedia साय्क्लोपीडिआ n.--- सर्वसंग्रहकोश.
Cylinder सिलिंडर् n.--- लंबवर्तुळ, लंबगोल.
Cylindric सिलिंड्रिक् a.--- लंबवर्तुळाकार.
Cymbal सिम्बल् n.--- ताल, झांज, झांझरी.
Cynic, Cynical सिनिक्, सिनिकल् a.--- तुसडा, हिरवट, माणूसघाण्या, नाक मुरडणारा, टवाळ, टिंगलखोर, निष्ठाशून्य, श्रद्धाहीन, वावदूक, चावट. Cynic n… उपभोग-(-वाडा-)स (टर उडवून) तुच्छ लेखणाऱ्या आत्मसंयमपुरस्कर्त्या ग्रीक पंथाचा अनुयायी. मानवी प्रामाणिकपणाची/सचोटीची अविश्वासपूर्वक टवाळी करणारा माणूस. गुणवत्तेस नाक मुराडणारा (एका दृष्टीने निराशवादी) अश्रद्ध माणूस.
Cynicism सिनिसिझम् n.--- प्रत्येक गोष्टीस (कार्य, विचार, तत्व, इ.) नाक मुरडण्याची वृत्ति/खोड. अतिटीकाखोरी, टवाळखोरी, टिंगलखोरी, अश्रद्धपणा, गुणविडंबन, (मनुष्याच्या स्वभावाबद्दल/नीतिबद्दल) कुत्सित/फटकळ निराशावाद. निष्ठाशून्यता.
Cynosure सि(साय्)नोस्युअर् n.--- ‘Ursa Minor’ हा तारकापुंज. आकर्षणकेंद्र, कुतूहल-वस्तु/-विषय.
Cypher साय्फर् n.--- पूज्य, शून्य.
Cypress साय्प्रेस् n.--- सुरूचे झाड.
Cypriot सिप्रिअट् n.--- ‘Cyprus’ चा नागरिक/निवासी.
Cyprus सायप्रस् n.--- तुर्कस्तानच्या दक्षिणेस व सीरियाच्या पश्चिमेस सुमारे ६० कि.मी. दूर भूमध्यसमुद्रातील एक द्वॆप. इ.स. १९८३ पासून तुर्की व ग्रीक जमातींत दुभंगलेले राष्ट्र.
Cyst सिस्ट् n.--- मूत्राशय.
Cyto = Cell (जीवपेशी).
Cytology सायटॉलॉजी n.--- जीवापेशींचे शास्त्र.
Cytoplasm सायटोप्लाझम् n.---
Czar झार् n.--- रशियाच्या राजाचा किताब.
Czarina झारिना n.--- रशियाच्या राणीचा किताब.
Czarovitch झारउइच् n.--- रशियाचा युवराज.