Purblind पर्ब्लाइंड् a.--- मंददृष्टीचा, डोळ्याने अधु.
Purchase पर्चेस् v.t.--- खरेदी करणे, मिळविणे. n.--- खरेदी.
Purchaser पर्चेसर् n.--- खरेदी करणारा, विकत घेणारा.
Pure प्युअर् a.--- निर्मळ, शुद्ध, चोख, साधे, प्रांजल, खरा, अस्सल.
Puree प्युअरी n.--- रबडा. v.t.--- रबडा करणे.
Purgative पर्गेटिव्ह् n.--- रेचक, जुलाबाचे औषध.
Purge पर्ज् v.t.--- जुलाब देणे / होणे. n.--- जुलाब, रेच. झाडा, घाण बाहेर काढण्याची प्रक्रिया.
Purging पर्जिंग् n.--- जुलाब, ढाळ, हगवण.
Purify प्यूरिफाय् v.i.--- स्वच्छ / पवित्र करणे, शोधणे.
Purist प्युअरिस्ट् n.--- शुद्धतेच्या / अचूकतेच्या (विशे. भाषेच्या) बाबतींत (अति-) चोखंदळ. (अति-)सोवळा माणूस.
Puritan प्यूरिटन् n.--- ख्रिश्चन धर्मातील एक कट्टर धर्माचारण्यांच्या पंथाचा अनुयायी. कट्टर नैतिकतावादी / सदाचारनिष्ठ माणूस.
Purity प्यूरिटि n.--- स्वच्छपणा, चोखपणा.
Purl पर्ल् v.t.--- झुळझुळ वाहणे, खळखळणे. n.--- झुळझुळ.
Purlieu पर्ल्यू n.--- सार्वजनिक मोकळे रान, (सर्वांना मोकळे) गल्लीबोळ / चौक वगैरे.
Purloin पर्लॉइन् v.t.--- चोरी करणे, लुबाडणे, हडपणे.
Purple पर्पल् a.--- जांभळा, आरक्त, आजारी, राजकीय, नेत्रदीपक, रुबाबदार. v.t.--- जांभळा रंग देणे. n.--- जांभळा रंग, अंजिरी रंग.
Purport पर्पॉर्ट् v.t.--- अर्थ असणे, बोध होणे. n.--- तात्पर्य, अभिप्राय, खुलासा, हाशील. अर्थबोधात्मक / अभिप्रायदर्शक टिपण. अभिप्रेत / आपाततः अर्थ म्हणून दिसणे / दाखविणे. Purport to --- (विशिष्ट क्रिये-)च्या अभिप्रायाने / हेतूने प्रेरित असल्याचे दाखविणे / सुचविणे / भासविणे. (विशिष्ट कार्य) बाह्य प्रक्रियेच्या रूपांत / तांत्रिकरीत्या (कायदेशीरपणे / प्रामाणिकपणे असो / नसो) पार पाडणे / उरकणे / तसे केल्याचे दाखविणे / तसा आभास / देखावा निर्माण करणे. (eg. Respondent no. 2 defiantly purpoted to sell / purpotedly sold flat D-8 to Respondent no. 4. = प्रतिपक्षी २ ने … वरवर तरी विकण्याची प्रक्रिया पुरी केली.)
Purported पर्पॉर्टेड् a.--- भासमान, वरवर, बाह्यतः दिसणारा. (Letters issued under the purported signature of Jt. Secretary, Tribal Affairs, Smt. Pant are forgeries.)
Purportedly पर्पॉर्टेड्लि ad.--- बाह्यतः तरी, वरवर तरी, आपाततः.
Purpose पर्पझ् v.t.--- उद्देशणे, संकल्प करणे. n.--- मतलब.
Purposely पर्पझ्ली ad.--- बुद्धिपुरःसर.
Purr पर् v.t.--- घुरघुरणें, फुरफुरणे. n.--- घुरघुर, चुरचूर.
Purse पर्स् n.--- पैशाची पिशवी, कसा, तोडा, खजिना. v.t.--- ओठांचा चंबू करणे. = Pucker.
Purser पर्सर् n.--- गलबतावरचा पोतनीस. जहाज / विमान इ. मधील व्यवस्थापक.
Pursuant पर्स्युअन्ट् a.--- प्रमाणे, बरहुकूम, अनुरूप. ad.--- प्रमाणे.
Pursue पर्स्यू v.t.--- पाठलाग करणे, पिच्छा, प्रयत्न.
Pursuit पर्सूट् n.--- पाठलाग, पिच्छा, प्रयत्न.
Purulence प्युरुलेन्स् n.--- पू होणे, पू.
Purvey पर्व्हे v.t.--- अन्नसामुग्रीची योजना करणे. पुरविणे, पुरवठा करणे, वाटणे, वाटप करणे.
Purveyor पर्व्हेअर् n.--- मोदी, वाकनीस.
Pus पस् n.--- पू.
Push पुश् v.t.--- ढकलणे, रेटने, खेचणे, लोटणे, हिव्याने चालविणे.
Pushover पुश् ओव्हर् n.--- दुर्बल विरोधक, क्षुद्र शत्रु.
Pushtu पश्टू n.--- (या नावाची) अफगाण / पठाण लोकांची भाषा.
Pusillanimity प्युसिलॅनिमिटि n.--- भित्रेपणा, भेकडपणा, भ्याडपणा.
Pusillanimous प्युसिलॅनिमस् a.--- भित्रा, नामर्द, भेकड, भ्याड.
Puss पुस् n.--- म्यांव म्यांव, माऊ, मंगी.
Pussyfoot पुसीफूट् v.i.--- हलक्या पावलांनी चालणे, चोरून किंवा गुपचुप हालचाल करणे.
Pustule पस्च्यूल् n.--- पुटकुळी, पुळी, फोड.
Put पुट् v.t.--- ठेवणे, घालणे, स्थापणे, मांडणे. n.--- कृत्य, हालचाल, धक्का. a.--- त्याच अवस्थेतील. ‘जैसे थे’ स्थितींतील. Put away--- त्याग करणे. Put back --- मागे लोटणे. Put down --- खाली ठेवणे. Put forth --- पुढे करणे. Put in --- जागांचे जागी बसविणे. Put off --- उतरणे, काढणे. Put on --- टाकणे, धोरण करणे. Put out --- मालविणे, व्याजी लावणे. Put over --- वर बसवणे. Put in for --- हक्क सांगणे. Put up --- सहन करणे.
Put-upon पुट्-अपॉन् a.--- दडपलेला, दाबलेला, चरडलेला, जुलूम / जबरदस्तीने ग्रासलेला.
Putative प्यूटटिव्ह् a.--- मानीव, कथित, सर्वमान्य.
Putrefaction प्यूट्रिफॅक्शन् n.--- कुजण्याची / सडण्याची प्रक्रिया. प्रथिनांचे प्राणवायु-अभावी कुजून होणारे विघटन.
Putrefy प्यूट्रिफाय् v.t.--- नासणे, कुजणे, सडणे.
Putrescence प्यूट्रेसन्स् n.--- कुजण्याची / सडण्याची प्रक्रिया.
Putrescent प्यूट्रेसन्ट् a.--- कुजत चाललेला, कुजका, सडण्याच्या प्रक्रियेचा.
Putrid प्यूट्रिड् a.--- कूजलेला, कुजका, सडका.
Putsch पुच् n.--- क्रांति घडवून आणण्याचा प्रयत्न, विरोधीउठाव, (प्रस्थापित व्यवस्थेवर) हल्ला / चढाई.
Putty पुटि n.--- लुकण, लांबी. v.t.--- लांबी भरणे.
Puzzle पझल् v.t.--- घोटाळ्यात पाडणे, निरुत्तर करणे. n.--- घोटाळा, कोडे, कूट, गूढ.
Pigmy पिग्मि a.--- ठेंगू, खुजा, टारगा, छोटा.
Pylon पायलन् n.--- विजेच्या तारा इ. टांगण्याचा मनोरा. (विजेच्या) तारांचा आधारस्तंभ.
Pyramid पिरॅमिड् n.--- मनोरा.
Pyre पायर् n.--- चिता, सरण, शरण.
Pyrites पिरिटिझ् n.--- सुवर्णमुखी, सुवर्णमाक्षिक.
Pyrotechnic पायरटेक्निक् a.--- दारूकामाचा.
Pyrotechnics पायरटेक्निक्स् n.--- दारूकाम, आतषबाजी.
Pyrrhic victory पिरिक् व्हिक्ट्रि n.--- ‘Pyrrhus’ च्या विजयासारखा (म्हणजे अत्यंत हानिकारक किंवा महागडा) विजय.