Ski-Sla

Ski
Skiff स्किफ् n.--- लहान होडी.
Skilful स्किल्फुल् a.--- कसबी, कुशल.
Skill स्किल् n.--- कसब, चातुर्य, हिकमत.
Skim स्किम् v.t.--- -मधील मुख्यांश काढणे. ग्रंथातील मुख्य मुद्द्यांवर एक उडती नजर टाकणे. सुळकन सरपटत जाणे, छाटणे, साय / मलई काढणे. v.i.--- पृष्ठभागावरून / पृष्ठभागाच्या जवळून हलकेच तरंगत / उडत जाणे. v.t.--- -ला हलकेच स्पर्श असणे. (Her creme dress just about skims the knee.)
Skimmer स्किमर् n.--- झारा, शिबे.
Skimp स्किम्प् = Serimp.
Skimpy स्किम्पी a.--- काटकसरी, कवडीचुंबक, चिक्कू. तोकडा, अपुरा, अर्धवट. (eg. Skimpy attire).
Skin स्किन् n.--- कातडे, सालटे, चामडे, टरफल. कातडीसारखा पृष्ठभाग. v.t.--- कातडे काढणे, कातडे धारण करणे, कातडे उत्पन्न करणे.
Skin-deep स्किन्-डीप् a.--- वरवरचा, वरवर. Skin-flint --- कवडीचुंबक.
Skink स्किंक् n.--- तुकतुकीत, खवलेदार अंगाचा एक लहान आकाराचा सरड, सापसुरळी, गणपत.
Skinny स्किनी a.--- कातड्याचा, सडपातळ.
Skip स्किप् v.t.--- वगळणे, सोडणे, उडी मारणे. n.--- उडी.
Skipper स्किपर् n.--- प्रमुख, नेता, नायक, उडी मारणारा.
Skirmish स्कर्मिश् v.i.--- चकमक झडणे. n.--- चकमक, झटापट.
Skirt स्कर्ट् n.--- घेर, पदर, सोगा, घोळ.
Skitter स्किटर् v.i.--- हळुवारपणे / हलकेच उडत / सरकत जाणे.
Skittish स्किटिश् a.--- नाचरा, बुजरा, बुजर, चंचल, अस्थिर, लहरी.
Skulduggery स्कल्डगरी n.--- कारस्थानीपणा, पाताळयंत्रीपणा, कावेबाजी; लबाडी, भ्रष्ट आचार, लफंगेपणा.
Skulk स्कल्क् v.--- पळ काढणे, सटकणे. लपून / दडून बसणे. कामचुकारपणा करणे. n.--- पळपुटा; कामचुकार.
Skull स्कल् n.--- डोक्याची कवटी, मेंदू.
Skull-cap स्कल्-कॅप् n.--- डोक्याचा वरील भाग घट्ट झाकणारी (मुसलमानी) टोपी.
Skunk स्कंक् n.--- काळ्यापांढऱ्या पट्टयांचा, केसाळ शेपटीचा, मांसाहारी, मांजराच्या आकाराचा, दुर्गंधयुक्त स्त्राव सोडणारा एक सस्तन प्राणी.
Sky स्काय् n.--- आभाळ, आकाश. v.t.--- आकाशात उडवणे.
Skylark स्काय्लार्क् n.--- कुकुडकुंभा, चंडोलपक्षी, भारद्वाज.
Skylight स्काय्लाइट् n.--- गवाक्ष, धाबे.
Slab स्लॅब् n.--- शिळा, पट्ट. a.--- चिकट, चिकचिकीत.
Slabber स्लॅबर् v.i.--- लाळ गळणे, सांडणे. n.--- लाळ.
Slack स्लॅक् a.--- सुटा, सैल, सुस्त, ढिला, शिथिल, आळशी, संथ, मंद, लुळा. निष्काळजी, बेपर्वा, गाफील, बेफिकीर, चुकार. v.i.--- ढिला इ. (a.) पडणे / होणे. v.t.--- सैल करणे, जोर कमी करणे, विरघळणे. -ला ढिला इ. (a.) सोडणे / करणे. n.--- ढिलाई, सुस्ती, मंदी, संथपणा. मंदीचा काळ.
Slacken स्लॅकन् v.i./ v.t.--- ‘Slack’ (a.) होणे / करणे. सुस्तावणे, मंदावणे.
Slacks स्लॅक्स् n.--- सैल विजार (घरगुती / अनौपचारिक वापराची).
Slag स्लॅग् n.--- (खनिज धातूतील) वेगवेगळे अशुद्ध द्रव्य, अशुद्ध भाग.
Slake स्लेक् v.t.--- मालविणे, विरविणे. (चुना).
Slam स्लॅम् v.t.--- (दार इ.) जोराने / आपटून बंद करणे. जोराने खाली फेकणे / आदळणे. -वर प्रखर टीका करणे.
Slander स्लॅन्डर् v.t.--- तोहमत आणणे, चहाडी करणे. n.--- तोहमत, चहाडी.
Slanderer स्लॅन्डरर् n.--- चहाडखोर, निंदक.
Slanderous स्लॅन्डरस् a.--- तोहमती.
Slang स्लॅङ् n.--- ग्राम्य / हीन दर्जाची भाषा; मान्यता ना पावलेली बोली / शब्दावलि. v.i.--- ग्राम्य / अप्रतिष्ठित भाषा वापरणे, अपशब्द बोलणे, शिव्या देणे.
Slant स्लॅन्ट् a.--- तिरकस, उतरता.
Slap स्लॅप् v.t.--- चपराक मारणे. -ला / -वर चापटीसारख्या क्रियेने लावणे. ad.--- रपकन, झरकन.
Slapstick स्लॅप्स्टिक् n.--- गोंधळ-नाट्य; a.--- गोंधळाचा, धिंगाण्याच्या स्वरूपाचा.
Slash स्लॅश् v.t.---सपासप तोंडाने, सपासप वार करणे. n.--- तलवारीचा वार.
Slate स्लेट् n.--- दगडी फळी / पाटी चीप.
Slattern स्लॅटर्न् n.--- भोंगळी बायको, जोगम्मा.
Slaughter स्लॉटर् v.t.--- कत्तल करणे. n.--- कत्तल.
Slave स्लेव्ह् n.--- गुलाम.
Slaver स्लॅव्हर् n.--- गळणारी / तोंडातून बाहेर पडणारी लाळ. बरळ. खुशामतीची / हांजीखोरीने केलेली स्तुति. v.i.--- लाळ गाळणे. बरळणे. लाळघोटेपणा करणे.
Slaver स्लेव्हर् n.--- गुलामांचा व्यापारी.
Slavery स्लेव्हरि n.--- गुलामगिरी.
Slavish स्लेव्हिश् a.--- गुलामगिरीचे, म्हारकीचा, गुलामांचा.
Slay स्ले v.t.--- ठार मारणे, प्राण घेणे. (past tense --- Slew / slayed. Past participle --- Slain).
Slayer स्लेअर् n.--- खुनी.