Hobgoblin
Hobble हॉबल् v.i.--- लंगडणे, लंगडत चालणे. n.--- कचाट, अडचण, लचांड, लंगडशाई. v.t.--- लंगडविणे, अडचणीत टाकणे.
Hobby हॉबि n.--- आवडता विषय, छंद.
Hobgoblin
Hobnob
Hobo होबो n.--- बेकार भटक्या.
Hobson’s choice n.--- उपलब्ध गोष्ट स्वीकारणे वा अतृप्त राहणे असा पर्याय.
Hock हॉक् n.--- घोडा वा तत्सदृश चतुष्पादाच्या मागील पायाचा मधला सांधा.
Hocuspocus होकस्पोकस् n.--- छाछू, मंत्रतंत्र, जादू.
Hoe हो v.t.--- कुदळीने खणणे. n.--- कुदळ, कुदळी.
Hog हॉग् n.--- डुक्कर. v.i.--- केस / आयाळ कातरणे. ‘to the whole hog’ : एखादी गोष्ट परिपूर्णपणे करणे; पूर्ण निकालात काढणे; सोक्षमोक्ष लावणे; टोकास जाणे; अतिरेक करणे. ‘to the whole hog approach’ : पूर्णतः निकाल लावण्याची रीति. हावरेपणाने घेणे / लादणे, बळकावणे.
Hogwash हॉग्वॉश् n.--- जनावरांना (डुक्कर वगैरे) देण्याचा उष्ट्याखरकट्याचा काला, आंबवण. भिकार / मूल्यहीन / त्याज्य गोष्ट. तथ्यहीन / अर्थ-शून्य बडबड / लिखाण.
Hoi polloi हॉय् पॉलॉय् n.--- जनता, जनसामान्य, प्राकृतजन, बाजारबुणगे.
Hoiden हॉइडन् n.--- धिटुकली.
Hoise हॉइझ् v.t.--- चढविणे, उभारणे. Past tense / past participle : hoist. ‘Hoist with his own petard (शेकस्पीयर) : स्वतःच्याच स्फोटकाने (बॉम्ब इ.) उडविला गेलेला. स्वतःच्याच युक्तीने गोत्यांत आलेला.
Hoist हॉइस्ट् v.t.--- उभारणे, उंच करणे.
Hoity-toity हॉयटी-टॉयटी n.--- अकांडतांडव, आक्रस्ताळेपणा. दांडगाई. (फुकाचा) दिमाख / तोरा, भपका, चढेलपणा, मगरूरी. a.--- आक्रस्ताळा, दांडगा, तोरेबाज, चढेल, मगरूर.
Hold होल्ड् v.t.--- धरणे, मावून घेणे, मानणे, आवरणे, असणे. n.--- कबजा, धरपकड, कैद, आधार, अडकवण, ठाव, आसरा, मूठ. ‘to hold forth: उपदेशिणे, व्याख्यान देणे. ‘to hold out’: टिकणे, ठाम राहणे, अडून राहणे, तडजोड न करणे. ‘to take hold’: मूळ धरणे. ‘to put hold on’: -ला थांबविणे / स्थगित ठेवणे.
Hole होल् n.--- भोंक, बीळ, खळगा, खड्डा, घर.
Holiday हॉलिडे n.--- सण, सुट्टी. a.--- सणाचा, आनंदी.
Holism हॉ(हो)लिझम् n.--- स्वयंपूर्णतेचे तत्व (निसर्गांतील).
Holistic होलिस्टिक् a.--- स्वयंपूर्ण, परिपूर्ण, संपूर्णतासंपन्न.
Holler = Hollo
Hollo हॉलो int.--- अरे, अहो. v.i.--- मोठ्याने हाक मारणे, ओरडणे.
Hollow हॉलो n.--- पोकळ, रिता, रिकामा, मनाचा कुजका, खोल, खळगा, लवण, विवर. v.t.--- पोकळ करणे, पोखरणे, खोलगटणे.
Holocaust (The Holocaust) हॉलकॉस्ट् n.--- होम, नाश, सत्यानाश, संहार, कंदन, दुसर्या जागतिक महायुद्धाच्या अवधीत (इ.स. १९३९-४५) जर्मन शासक हिटलर व त्याचा पक्ष-नात्सी-यांनी योजनापूर्वक घडवून आणलेला यहुदी (ज्यू) लोकांचा प्रचंड संहार.
Hologram हॉलग्रॅम् n.--- लेझर (laser) किरणांच्या साहाय्याने साधलेले त्रिमिति-चित्र.
Holograph होलोग्रॅफ् n.--- स्वहस्तलिखित, दस्तुरखुद; स्वदस्तुराचा लेख.
Holster होल्स्टर् n.--- पिस्तुलाचे (चामड्याचे) म्यान.
Holy होलि a.--- पवित्र, शुद्ध, निर्मळ, धार्मिक.
Holyday होलिडे n.--- सण, पवित्र दिवस.
Homage होमेज् n.--- मजुरी, सेवा, राजवंदन, मांडलिकत्वाच्या कबुलीची अभिव्यक्ती. मांडलिक सभा / मांडलिकसमूह. ‘To do / render h.: मांडलिकत्व (औपचारिकपणे) कबूल / व्यक्त करणे, मानवंदना देणे, आदरांजली वाहणे.
Home होम् n.--- स्वगृह, आपले घर, स्वदेश.
Homefelt होम्फेल्ट् a.--- अंतस्थ, गुप्त.
Homelike होम्लाइक् a.--- घरासारखा, सुखकारक.
Homeling होम्लिंग् n.--- मूळचा रहिवाशी.
Homeopath हॉ(हो)मिओपॅथ् n.--- Homeopathy प्रमाणे चिकित्सा करणारा / वैद्य.
Homeopathic हॉ(हो)मिओपॅथिक् a.--- Homeopathy संबंधीचा.
Homeopathy हॉ(हो)मिओपॅथी n.--- हानेमान (Hahneman) या जर्मन शास्त्रज्ञाने इ.स. १७९६ च्या सुमारास काढलेली रोगचिकित्सापद्धति जींत (बहुधा अत्यल्प प्रमाणात दिलेल्या औषधद्रव्याने विशिष्ट रोगाची लक्षणे उत्पन्न करून, ‘similia similibus curantur’ या सिद्धांताप्रमाणे त्या रोगावर उपचार केला जातो.
Homerule होम्रूल् n.--- साम्राज्यांतर्गत स्वराज्य.
Homeward होम्वर्ड् ad.--- घराकडे, घर रोखून.
Homicide हॉमिसाइड् n.--- (मानवकृत) मानवहत्या, मानवहंता.
Homily हॉमिली n.---
Homo होमो --- ‘मानव’, ‘मानव व मानव-सदृश प्राण्यांचा गट. सम (same), सदृश, अशा अर्थाचे उपपद.
Homo sapiens होमो सेपियन्झ् n.--- मानववंश.
Homogeneity होमोजीनीटी / होमोजीनीइटी n.--- एकजिन्नसीपणा. पहा: Heterogeneity.
Homogeneous होमोजीनियस् / हॉमजीनियस् a.--- एकाच घटकद्रव्याने बनलेला. एकजिन्नसी. पहा: Heterogeneous.
Homogenize / Homogenise हॉमॉजेनाइझ् v.t.--- एकजिनसी / एकजीव / समानतापूर्ण बजविणे.
Homologous होमॉलगस् a.--- समान, सदृश, तुल्य. ‘homology’-युक्त.
Homology होमॉलजी n.--- शारीरावयवांचे मूलभूत रचनासाधर्म्य.
Homosexual होमोसेक्झुअल् a. / n.--- समलैंगिक व्यक्तीबद्दल लैंगिक आकर्षण असणारा (मनुष्य).
Homunculus = Homuncule = Homuncle होमंक्युलस् n.--- बटुवामन, छोटा मानव, वामनमूर्ति.
Honcho हाँचो / हॉन्चो n.--- वरिष्ठ पदावरील अधिकारी, उच्चपदस्थ. वरिष्ठ / ज्येष्ठ अधिकारी.
Hone होन् n.--- निसाणा, सहाण. v.t.--- निसण्यावर लावणे.
Honest आॅनेस्ट् a.--- खरा, प्रामाणिक, रास्त, न्याय्य. -Honest - to - goodness : प्रामाणिकपणाचा, खराखुरा, ऐचित्याची चाड ठेवून केलेला / ठरविलेला.
Honesty आॅनेस्टी n.--- खरेपणा, प्रामाणिकपणा.
Honey हनि n.--- मध, मधु. v.t.--- गोड गोड बोलणे.
Honey bee हनि बी n.--- मधमाशी.
Honeycomb हनिकोम्ब् n.--- मधमाशाचे पोळे.
Honeymoon हनिमून् n.--- लग्न झाल्यावरचा नवदंपतीचा पहिला महिना (विशेषतः रम्य एकांतस्थळी घालविलेला), लग्नाचा दिवस, मधुचंद्र. v.i.--- मधुचंद्र व्यतीत करणे / भोगणे.
Honeymooner हनिमूनर् n.--- मधुचंद्र साजरा करणारा.
Honorary आॅनररी a.--- मानाधिष्ठित, केवळ सन्मानार्थ / विशेष कर्तृत्वाच्या आदरार्थ दिलेला (किताब, पद, पदवी इ.). विना वेतन (पद, कार्य), स्वयंसेवकीय स्वरूपाचा. (अवैतनिक, मानद (हिंदी)).
Honoris causa आॅनरिस् कॉजा ad.--- (=for the sake of honor) सन्मानार्थ, मानाचे / आदराचे प्रतीक म्हणून.
Honour =Honor आॅनर् v.t.--- मान देणे, प्रतिष्ठा राखणे. n.--- मान, अब्रू, पूज्यबुद्धि, सत्कार, पातिव्रत्य, नीतिमत्ता पदवी / वचन, अब्रू, इज्जत, गुण.
Honourable = Honorable आॅनरबल् a.--- आमदार (एक पदवी), संभावित.
Honorarium आॅनरेरियम् n.--- मानधन, विद्वान व कारागीर लोकांस त्यांच्या श्रमाबद्दल दिलेले बक्षीस.