Hew-Hoa

Hew ह्यू v.t.--- कापणे, तोडणे.
Hexagon हेग्झॅगॉन् n.--- षट्कोनाकृति.
Heyday हे डे int.--- ऐन भर, बहर.
Hiatus हाएटस् n.--- त्रुटि; खंड; अंतर.
Hibernate हायबर्नेट् v.i.--- शरीर थिजवून राहणे.
Hibernation हायबर्नेशन् n.--- शरीरप्रक्रिया स्तंभित करणे, शरीरप्रक्रियांचे स्तंभन.
Hiccough हिकफ् n.--- उचकी. v.t.--- उचकी लागणे/देणे. उचक्या देत म्हणणे / बोलणे. = Hiccup.
Hidden हिडन् p.p.a.--- लपवलेला, गुप्त.
Hide हाइड् n.--- चामडे, कातडे (विशेषतः मोठ्या जनावराचे). v.t. and v.i.--- लपवणे, लपणे, झाकणे. चामडी सोलणे. Hide-bound : कडवा, कट्टर, संकुचित.
Hideous हिडिअस् a.--- भयंकर, विक्राळ, अघोर, गलिच्छ, किळसवाणा.
Hie हाय् v.i.--- लगेलगे जाणे, त्वरा करणे.
Hierarchical हायरार्कियल् a.--- ‘Hierarchy’- चा /-विषयक.
Hierarchy हायरा(र्)की n.--- ख्रिश्चनधर्म-संघटनेतील ज्येष्ठकनिष्ठ अधिकारपदावलि. (कोणत्याही व्यवस्थापनांतील) उतरंड. उच्चनीचपदावलि. अधिकार(रि) सोपान
Hieroglyph हाय्रग्लिफ् n.--- चित्रलिपीतील (चित्ररूप) अक्षर / शब्द / प्रतीक.
Hieroglyphic हायरग्लिफिक् a./n.--- चित्रलिपिविषयक, चित्रलिपीच्या स्वरूपाचा, चित्रलिपीतील अक्षर / शब्द / वाचन / प्रतीक.
Hieroglyphical हायरग्लिफिकल् a.--- = hieroglyphic.
Hieroglyphics हायरग्लिफिक्स् n.--- चित्रलिपिशास्त्र.
Higgle हिगल् v.t.--- घासाघीस करणे, सौदा करण्यात ओढाताण करणे.
Higgledy-piggledy हिगल्डि-पिगल्डि ad. / a.--- सैरावैरा (झालेला), सैरभैर.
High हाय् a.--- उंच, उन्नत, धिप्पाड, प्रौढ, प्रशस्त, उदात्त, वरिष्ठ, मोठा, थोर, कुलीन, पहाडी, महाग.
High-brow हायब्राउ a.--- बुद्धिमत्ताशील, विद्यासंपन्न, विद्वत्तायुक्त, उच्च-अभिरुचीचा. अशा बुद्धि/संस्कृति/राहणीचा (उच्चभ्रू) आव आणणारा.
Highborn हाय्बॉर्न् a.--- कुलीन, गर्भश्रीमान.
Highfalutin हाय्फलूटिन् a.--- ऐटदार, नखरेल, आलंकारिक.
Highflier हाय्फ्लायर् n.--- दिमाख / आढ्यता मिरविणारा.
Highland हायलंड् n.--- डोंगराळ / उंच / प्रदेश, अधित्यका.
Highminded हाय्माइंडेड् a.--- थोर मनाचा, मानी.
Highness हाय्नेस् n.--- उंची, उच्चता, मोठेपणा.
Highwayman हाय्वेमन् n.--- वाटमाऱ्या, लुटारू.
Hijack हाइजॅक् v.t.--- (प्रवासांत असणाऱ्या विमान इ. वाहना) -चे बळेच / भय घालून / कपटाने / कारस्थानपूर्वक दहशत घालून अपहरण करणे. -ला अशा प्रकारे पळवून नेणे. (व्यक्ति, संस्था, इ.) -ला बळेच / कष्टाने नियंत्रणात घेऊन हवे तसे चालविणे / वापरणे. n.--- ‘hijack’(v.)-कृति, पळवून नेण्याची कृति, अपहरण, अपहार.
Hike हाइक् n.--- दूर प्रदेशांतील भ्रमण / भटकंती. v.i.--- (गावोगाव / रानोमाळ) भटकणे. v.t.--- (किंमत / दर / कर) वाढवणे.
Hilarious हिलेरियस् a.--- मजेदार, गंमतीदार, थट्टेखोर, हास्यरसप्रधान.
Hilarity हिलॅरिटि n.--- थट्टा, मस्करी, आनंद, मौज.
Hill हिल् n.--- टेकडी, डोंगर, टेकाड.
Hillock हिलॉक् n.--- टेपर, टेकाड.
Hilt हिल्ट् n.--- कबजा, मूठ, दस्ता, परज.
Him हिम् pron.--- त्याला. Himself हिम्सेल्फ् : तो स्वतः.
Hind हाइन्ड् a.--- मागील. n.--- हरिणी, गावंढळ.
Hinder हिन्डर् v.t.--- अटकाव/अडथळा करणे.
Hinderance हिन्डरन्स् n.--- हरकत, अटकाव, अडथळा.
Hindermost हिन्डर्मोस्ट् a.--- सर्वांमागाचा, पाठीमागचा.
Hinge हिंज् n.--- नरमादी, बिजागिरी, बिजागर.
Hint हिंट् v.t.--- सूचना करणे / देणे. n.--- सूचना.
Hip हिप् n.--- कमरेचा खवाटा, मांडीचा खुबा, कमरेखालील व मांडीच्या वरील फुगीर भाग.
Hire हायर् v.t.--- भाड्याने देणे / घेणे. n.--- भाडे, मोल.
Hireling हायर्लिंग् n. and a.--- मोलकरी, मजूरदार.
His हिझ् pron.--- त्याचा.
Hispanic हिस्पॅनिक् a.--- स्पेन (Spain), पोर्तुगाल (Portugal) वा Latin America -या विषयक / याचा / यांच्या लक्षणांनी युक्त.
Hiss हिस् v.t.--- फुसकरणे. n.--- फुसकारा, धुसफूस.
Histamine हिस्टमीन् n.--- ‘Allergy’ उत्पन्न करणारे देहगत रसायन.
Histology हिस्टॉलजी / हिस्टॉलॉजी n.--- शारीरावयवाच्या सूक्ष्मरचनेचा अभ्यास / शास्त्र.
Historian हिस्टोरिअन् n.--- इतिहास / बखर लिहिणारा.
Historic हिस्टॉरिक् a.--- भूतकालवाचक. ऐतिहासिक (इतिहासबद्ध होण्याजोग्या) महत्वाचा. Historic present (व्याकरणात): भूतकालवाचक वर्तमानकाल.
Historical हिस्टॉरिकल् a.--- ऐतिहासिक, बखरीचा.
Historiographer हिस्टोरिअॉग्रफर् n.--- इतिहासकार, बखरकार.
Historiography हिस्टोरिअॉग्रफी n.--- इतिहासलेखन.
Historiology हिस्टीरिअॉलॉजी n.--- इतिहासाभ्यास, इतिहासविद्या.
History हिस्टरि n.--- इतिहास, बखर, आख्यायिका, पोवाडा.
Histrionic हिस्ट्रिआॅनिक् a.--- नाट्य-/अभिनय-/विषयक, नाटकी. सोंगाडेपणाचा. n.--- नट, सोंगाड्या, नाटक्या.
Histrionics हिस्ट्रिआॅनिक्स् n.--- नाट्य-/अभिनय-/-कला/-विद्या. सोंगाडेपणा, नाटकीपणा. ढोंग.
Hit हिट् v.t.--- मारणे, हाणणे, जमणे, लाग साधणे. n.--- आघात, फटका, टोमणा, लाग.
Hitch हिच् n.--- आदकाथॆ. व्यत्यय, ताण, ओढ, हिसका, गाठ. V.t.--- हादरे / धक्के खात जाणे, अडकावणे, बांधून टाकणे, खसकन ओढणे, सरकविणे, जुंपणे.
Hither हिदर् ad.--- इकडे. a.--- इकडचा, या बाजूचा.
HIV Human Immunodeficiency Virus n.--- ‘एड्स (AIDS)’ हा रोग उत्पन्न करणारा विषाणू.
Hive हाइव्ह् v.t.--- पोळ्यात (मधमाश्यांना) वसविणे. (मधमाशीचे) पोळ्यांत / मोहोळांत स्थायिक होणे. n.--- मधमाशीचे घर, मोहोळ, थवा, गर्दी.
Ho plum n.---
Hoar होअर् a.--- सफेत, पांढरा, केस पिकलेला, पलितमौली.
Hoar-frost होअर्-फ्रॉस्ट् n.--- पांढरा हिमकणथर, नीहार.
Hoard होर्ड् v.t.--- सांठवणे. n.--- सांठा, संचय, ठेव.
Hoarse होर्स् a.--- घोगरा, बसलेल्या गळ्याचा.
Hoax होक्स् n.--- लुच्चेगिरी, फसवणे.