Fak-Fan

Fake n.--- भोंदू, तोतया a.--- खोटा,नकली, बनावटी Fakery n.--- भोंदूगिरी v.t.--- चोरणे, फसवणे.
Falcon फॉ(ल्)कन् n.--- (लहान पक्ष्यांना मारून खाणारा) ससाणा (पक्षी)
Falconer फॉ(ल्)कनर् n.--- “Falcon” पक्षी पाळण्याचा धंदा करणारा.
Falconry फॉकन्री n.--- ससाणे पाळण्याचे शास्त्र / धंदा / छंद.
Fall फॉल् n.--- उत्तर अमेरिकेतील पाने गळून पडण्याचा शरद ऋतु (Autumn).v.i.--- पडणे, खाली पडणे, मिळणे, हलका होणे, भ्रष्ट होणे, उपजणे, मागे हटणे, तावडीत सापडणे, फशी पडणे, खाली बसणे. n.--- पतन, धबधबा, गलन, पात, उतरण.
Fall (for) फॉल् फॉर् v.i.--- च्या मोहात / प्रेमात पडणे, कडे आकृष्ट होणे.
Fall (in) फॉल इन् v.i.--- विशिष्ट (सैनिक-) गटात योग्य जागी सामावून जाणे.
Fall ( in with) फॉल इन विथ् v.i.--- शी सहमत होणे.
Fallacious फॅलेशिअस् a.--- भ्रामक, आभासाचा.
Fallacy फॅलसि n.--- खोडसाळपणा, खोटेपणा, चूक.
Fallen फॉलन् p.p.a.--- पतित, भ्रष्ट, पडलेला.
Fallible फॉलिबल् a.---
Fallow फॅलो a.--- पडित, बिनलागवडीची, पडिक, पडकर n.--- पडिक जमीन.
False फॉल्स् a.--- खोटा, अप्रामाणिक, नकली, बनावटी.
Falsefaced फॉल्स्फेसेड् a.--- ढोंगी, दांभिक.
Falsifier फॉल्सिफायर् n.--- लबाड मनुष्य.
Falsify फॉल्सिफाय् v.t.--- खोटे करणे, खोटा पाडणे.
Falter फॉल्टर् v.t.--- अडखळणे, लटपटणे, अस्पष्ट होणे. n.--- कंप, कांकू, दुर्बलता.
Fame फेम् n.--- लौकिक, कीर्ति, प्रसिद्धि, अफवा.
Famed फेम्ड् a.--- प्रसिद्ध, कीर्तिमान्, प्रख्यात.
Familial a.--
Familiar फॅमिलिअर् a.--- ओळखीचा, घरोब्याचा, सराव झालेला, भीड चेपलेला, खेळीमेळीचा, घरचा.
Familiarity फॅमिलििअॅरिटी n.--- घरोबा, घसट, स्नेह.
Familiarize फॅमिलिअराइझ् v.t.--- सवयीचा करणे, ओळखीचा करणेFamily फॅमिली n.--- कुटुंब, खटले, कुळ, घराणे.
Famine फॅमिन् n.--- दुष्काळ, दुर्भिक्ष, अन्नटंचाई.
Famish फॅमिश् v.t. & v.i.--- उपाशी मारणे, भुकेने व्याकुळ करणे होणे.
Famous फेमस् a.--- प्रख्यात, नामांकित, कीर्तिवान.
Fan फॅन् v.t.--- पंख्याने वारा घालणे, पंख्याने हाकलणे, n.--- पंखा, विझणा.
Fanatic फेनॅटिक् a.---धर्मवेडा, देवपिसा, धर्मखुळा, कट्टर अंधभक्त.
Fanaticism फेनॅटिसिझम् n.--- धर्मवेड, धर्मखूळ, वेडी अंधश्रद्धा
Fancied फॅन्सिड् a.--- खोटे, कल्पनेचा
Fancy फॅन्सि v.t.--- कल्पना करणे, वाटणे, मनोदेवता धावणे. आवडणे, n.--- कल्पनाशक्ति, तरंग, लहर, छंद, आवड, आभास, कल्पना.
Fane n.--- फेन् देवालय.
Fanfare फॅनफेर् n.--- आत्मश्लाघा, फुशारकी, शृंगनाद,(तुतारी, शिंग, कर्णा, भोंगा इ. चा) निनाद / घोष, आरोळी. बाह्य / पोकळ, भडक देखावा, जाहिरातबाजी, गवगवा, गाजावाजा.
Fang फँग् n.--- (म़ाँसाहारी प्राण्याचा) भक्ष्य प्राण्यास पकडून ठेवण्याचा भोसकण्याचा दात. (साप इ. चा) विषदंत
Fangle फॅंंगल् n.--- नवीन (आचरटपणाची / मूर्खपणाची) शक्कल पद्धत v.t.--- (Also :New fangle ) (नवीन शोधून) काढणे, आगळीच प्रक्रीया / प्रकार मांडणे.
Fantastic फॅण्टास्टिक् also Fantastical a.--- छांदिष्ट, लहरी, कल्पनातरंग, हास्यजनक, अद्भुत अलौकिक अतर्क्य (अनुमोदनार्थी) छान, उत्तम / विचित्र कल्पनाविलासाने भरलेला.
Fantasy (also Phantasy) फँटसी n.--- कल्पनेची स्वैर भरारी, कल्पनाविलास, उत्प्रेक्षा,भ्रांति (आ) भास, भ्रम, विपर्यय (मिथ्याज्ञान), दिवास्वप्न, असेे काल्पनिक / आभासमय विश्व उत्पन्न करण्याची शक्ति v.i.--- अशा तर्हेचा कल्पनाविलास इ. करणे / निर्मिणे.