visa व्हीज n.--- (पारपत्रांकित) परदेशप्रवेशनिर्गमानुज्ञा.
visage विझिज् n.--- चेहरा, मुखवटा, रूप, चेहरामोहरा.
viscera (pl.) व्हिसरा n. --- (विशे. कबंधगत) शरीरस्थ इंद्रियसमूह. अंतर्भाग, गाभा.
visceral व्हिसरल् a.--- ‘viscera’ संबंधीचा. खोलवर परिणाम करणारा.
viscosity व्हिस्कॉसिटी n.--- (द्रवातील) स्निग्धता, चिकटपणा.
viscous व्हिस्कस् a.--- चिकट, तेलकट, स्निग्ध (द्राव).
visibility व्हिझिबिलिटी n.--- दृश्यता, प्रकटपणा.
visible व्हिझिबल् a.--- दृश्य, प्रगट.
vision व्हिझन् n.--- नजर, दृष्टांत, भास, स्वप्न, दृष्टि (सामर्थ्य), रुपेंद्रिय अंतर्ज्ञान, साक्षात्कार, ध्यान-/समाधि -द्वारा अनुभूति, असाधारण / असामान्य जाण. दूरदृष्टि.
visionary व्हिझनरी a.--- काल्पनिक, असत्य. साक्षात्कारी. a./ n.--- स्वप्ने पाहणारा, कल्पक, द्रष्टा, साक्षात्कारी, प्रतिभाशाली.
visit व्हिझिट् n.--- भेट, पाहणी. v.t.--- भेटीला / पाहायला जाणे.
visitor व्हिझिटर् n.--- भेटीस येणारा पाहुणा.
visor / Vizor व्हिझर् n.--- मुखवटा.
vista व्हिस्टा n.--- देखावा, मार्गातील दुतर्फ़ा झाडे, चौकसदार. दूरवर / लांबवर पसरलेल्या (वृक्षपंक्तीमधील रस्ता, प्रासादांतील वाटा; दीर्घकालीन इतिहास इ. सारख्या) देखाव्याचे / चित्रमालेचे एकत्र, समग्र दर्शन.
visual व्हिज्युअल् a.--- दृष्टीविषयक. दृष्टीगम्य. ‘Vision’ मुळे उपलब्ध, मनश्चक्षूस स्पष्ट प्रतीत होणारा.
vital व्हायटल् a.--- प्राणरक्षण करणारा, जिव्हाळ्याचा.
vitality व्हायटॅलिटी n.--- प्राण, जीव, चेतना, तेज.
vitamin व्हिटमिन् / व्हाय्टमिन् n.--- सजीव व देहाचे बाह्यद्रव्यग्रहण, उत्सर्जन, पोषण या कार्यासाठी अल्पप्रमाणांत लागणाऱ्या आवश्यक दैहिक रासायनिक संयुगांपैकी एक.
vitriol व्हिट्रिओल् n.-- जहाल ग्रंथ, जळजळीत वचन.
vitriolic व्हिट्रिओलिक् a.--- जहाल, प्रखर, जळजळीत.
vitro व्हिट्रो (लॅटिन ‘vitrum’(=glass) पासून) काच / काचेचे पात्र इ. अर्थाचे पद. उदा. In vitro: (प्रयोगशाळेतील / रुग्णालयातील इ.) काच-पात्रात. (The aged couple decided to have a baby in vitro.)
vituperate व्हिट्यूपरेट् v.i.--- शिवीगाळ करणे, धिक्कार व्यक्त करणे, अपशब्द काढणे / उच्चारणे भर्त्सना करणे.
vituperation व्हिट्यूपरेशन् n.--- vituperate करण्याची क्रिया, गालिप्रदान, भर्त्सना, निंदा नालस्ती.
vituperative व्हिट्यूपरेटिव्ह् a.--- शिवराळ, निंदात्मक, धिक्कारयुक्त, अपशब्दप्रचुर.
viva व्हीव्हा exclamatory --- (मूळ ‘इटालियन (Italian)) ‘दीर्घमायु:’, ‘दिर्घयुरस्तु’, ‘झिंदाबाद’, ‘जीते राहो’.
viva व्हाय्व्हा n.--- = Viva voce. v.t.--- -ची तोंडी परीक्षा घेणे. (past tense / past participle: vivaed / viva’d. adverb.--- vivaing).
viva-voce व्हाय्व्हा व्होची n.--- तोंडी / मौखिक परीक्षा.
vivacious व्हिव्हेशस् a.--- उत्साहपूर्ण, चैतन्ययुक्त. उत्साही, आनंदी.
vivacity व्हिव्हॅसिटी n.--- उल्हास, उत्साह, आनंद.
vivid व्हिव्हिड् a.--- जिवंत(-पणाने युक्त / भरलेला). जोमदार (बुद्धि इ.) स्पष्टार्थदर्शी, सूक्ष्मार्थवाची (वर्णन इ.) स्पष्ट नि वेधक, हृदयस्पर्शी.
vividity व्हिव्हिडिटी n.--- ‘Vivid’ पणा.
vivify व्हिव्हिफाय् v.t.--- जिवंत करणे, सजीव करणे, सतेज करणे.
viviparous व्हिव्हिपरस् a.--- (बहुतेक सर्व सस्तन जीवांप्रमाणे) शरीरांतूनच थेट जन्मलेला, जरायुज, जारज.
vivisect व्हिव्हिसेक्ट् v.t.--- प्राण्यास जिवंत अवस्थेत कापणे. संशोधन, अभ्यास वा रोगोपचार म्हणून जिवंत शरीरावर शस्त्रक्रिया करणे.
vivisection व्हिव्हिसेक्शन् n.--- जिवंत प्राण्याचे शरीराच्छेदन. शरीरशास्त्राचा अभ्यास वा रोगचिकित्सा या साठी केलेली जिवंत प्राण्यांवरील शस्त्रक्रिया.
vivisectionist व्हिव्हिसेक्शनिस्ट् n.--- ‘Vivisection’ चा पुरस्कर्ता / समर्थक.
vivisector व्हिव्हिसेक्टर् n.--- ‘Vivisection’ करणारा.